राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली व जागतीक बँक यांच्या सहकार्याने नाहेप, वनामकृवि यांच्या विद्यमाने दोन व तीन आठवडयाचे प्रशिक्षण दि. 06 – 25 जुन, 2022 या दरम्‍यान भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथे करण्यात आले आहे.  राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वनामकृवि, परभणी आणि  भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार सदरील दोन व तीन आठवडीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन आठवडयाचे पीक व्यवस्थापनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर हे प्रशिक्षण दि. 06 – 17 जुन, 2022 दरम्यान आयोजित केले आहे. तसेच तीन आठवडीय कॅड/कॅम तंत्रज्ञानाचा कृषि यंत्र निर्मितीसाठी वापर हे प्रशिक्षण दि. 06 – 25 जुन, 2022 दरम्यान आयोजित केले आहे.

प्रशिक्षणासाठी एकूण ६५ पदव्युत्तर आणि आचार्य पदवी विद्यार्थी तसेच नाहेप प्रकल्पातील ६ अभियंते सहभागी झाले आहेत.

याचा उदघाटन समारोह दि ६ जून २०२२ रोजी कृषी व अन्न अभियांत्रिकी विभाग, भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो. वीरेंद्र तिवारी, संचालक भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. रिंतु बॅनर्जी, विभागप्रमुख, कृषी व अन्न अभियांत्रिकी विभाग, भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर या होत्या. डॉ. गोपाळ शिंदे, प्रमुख अन्वेषक, नाहेप प्रकल्प यांची ऑनलाईन उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र माचावरम यांनी केले. त्यांनी सदरील प्रशिक्षणाचा उद्देश विशद केला. सदरील प्रशिक्षणाचे आयोजन वनामकृवि, परभणी आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर यामध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करार अंतर्गत करण्यात आले आहे. प्रकल्पाचे उपप्रमुख आवेश प्रो तरुण कांती भट्टाचार्य यांनी आतापर्यंत राबविलेल्या विविध प्रशिक्षणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले कि या अंतर्गत सेन्सर्स, तंत्रज्ञान, IoT या विषयी संशोधन करण्यात येत आहे. डॉ गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी माहिती दिली.

प्रो. रिंतु बॅनर्जी यांनी कृषी व अन्न अभियांत्रिकी विभाग, भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर या विषयी विस्तृत माहिती दिली. विभागात होत असलेल्या संशोधन प्रकल्पना भेट देण्याचे आवाहन केले. विभागामध्ये कृषी यंत्रे, ऑटोमेशअन तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया. बीओटचानोलॉजि याविषयी सांगितले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात प्रो. तिवारी यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर मध्ये स्वागत केले. आत्मनिर्भर भारतासाठी कृषी यंत्रे, स्वयंचलित उपकरणे, प्रक्रिया तंत्रज्ञान यामध्ये संशोधन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. २०४७ च्या आत्मनिर्भर भारतासाठी विविध इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानामध्ये प्रगती आणि वापर होणे आवश्यक आहे. काटेकोर शेती तंत्रज्ञान अंगीकारणे काळाची गरज आहे. विद्यार्थांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून संशोधनासाठी वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमासाठी प्रो महुआ भट्टाचार्य, प्रो पियुष सोनी, प्रो हिफाजूर रेहमान यांची उपसथीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार कु. माया लक्ष्मी यांनी केले.

सदरील प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. प्रमोद येवले, मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी तसेच प्रो. व्हि.के. तिवारी, संचालक, भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर व डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि), वनामकृवि, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, प्रमुख अन्वेषक, नाहेप, वनामकृवि, परभणी, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. राजेंद्र माचावरम, डॉ. एम. भट्टाचार्य, प्रो. ए.के. देब यांनी केले आहे.