राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली व जागतीक बँक यांच्या सहकार्याने नाहेप, वनामकृवि यांच्या विद्यमाने दोन व तीन आठवडयाचे प्रशिक्षण दि. 06 – 25 जुन, 2022 या दरम्‍यान भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथे करण्यात आले आहे.  राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वनामकृवि, परभणी आणि  भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार सदरील दोन व तीन आठवडीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन आठवडयाचे पीक व्यवस्थापनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर हे प्रशिक्षण दि. 06 – 17 जुन, 2022 दरम्यान आयोजित केले आहे. तसेच तीन आठवडीय कॅड/कॅम तंत्रज्ञानाचा कृषि यंत्र निर्मितीसाठी वापर हे प्रशिक्षण दि. 06 – 25 जुन, 2022 दरम्यान आयोजित केले आहे.

या दोन्ही प्रशिक्षणासाठी एकूण 65 पदव्युत्तर / आचार्य पदवी विद्यार्थी तसेच नाहेप प्रकल्पातील शास्त्रज्ञ, अभियंते सहभागी होणार आहेत.

सदरील प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. प्रमोद येवले, मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी तसेच  प्रो. व्हि.के. तिवारी, संचालक, भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर व डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि), वनामकृवि, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, प्रमुख अन्वेषक, नाहेप, वनामकृवि, परभणी, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. राजेंद्र माचावरम, डॉ. एम. भट्टाचार्य, प्रो. ए.के. देब यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.