माजी संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परीषद, पुणे डॉ. एम. जी. लांडे आणि डॉ. माधवराव सानप, माजी पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र व तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जागतीक बॅक पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प नाहेप यासह दिनांक 18 एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिली. प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी त्याचे स्वागत केले. तसेच भेटीप्रसंगी त्यांनी प्रकल्पातील आंरराष्ट्रीय दर्जेचे चालु असलेल्या डिजिटल शेती संशोधन व तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिकासह माहिती दिली. प्रकल्पातील कृषि यंत्रमानव, ड्रोन स्वंयचित यंत्र आदिंच्या डिजीटल तंत्रज्ञानाचा शेतीतील वापराबाबत त्यांनी माहिती जाणुन घेतली. प्रकल्पात चालु असलेल्या संशोधनात्मक कामाबाबात त्यांनी प्रशंसा केली. आजच्या काळात अधुनिक तंत्रज्ञान हे शेतीसाठी महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत डॉ. के. के. डाखोरे, कृषी हवामान शास्त्रज्ञ आणि डॉ. सुरेश वाईकर यांची उपस्थिती होती. नाहेप प्रकल्पातील शास्त्रज्ञ व कर्मचारी इंजि. रवी कुमार कल्लोजी, डॉ. अनिकेत वाईकर, शिवानंद शिवपुजे, धम्मज्योती पिपंळेकर, डॉ. श्वेता सोळंके, डॉ. शिवराज शिंदे, फारुक आबुदल बारी, इंजि. संजीवनी कानवटे, इंजि. अपुर्वा देशमुख, प्रदिप मोकाशे, मुक्ता शिंदे, रामदास शिपंले, जगदीश माने आणि मारोती रणेर आदींनी प्रकल्पातील विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.