राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) येथे ग्राफटींग रोबोटच्या साहाय्याने पालेभाज्या व काही फळवर्गीय वाणांचे कलमीकरणाची प्रशिक्षण व कार्यशाळा दिनांक 13 व 14 मार्च, 2023 साऊथ कोरीयाच्या एच. आर. सी.  कंपनीद्वारे श्री जेरेमी एच जे पार्क यांच्या मागदर्शनाखाली नाहेप, वनामकृवी परभणी येथे सकाळी 10:00 ते सांयकाळी 05:00 पर्यंत आयोजीत करण्यात आलेला आहे. या कार्यशाळेचा उद्यघाटन सोहळा दिनांक 13 मार्च, 2023 रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. इंद्र मनी, वनामकृवी, परभणी यांची ऑनलाईन उपस्थिती होती व प्रमुख पाहूणे म्हणून संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले हे उपस्थित होते तसेच नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी संशोधक, प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी यांना माहिती दिली. हेल्पर रोबोटेक कंपनी, साऊथ कोरीया येथील संशोधक श्री जेरेमी एच जे पार्क यांनी कलमीकरण रोबोट विषयी सवीस्तर मार्गदर्शन केले.

या प्रात्याक्षिक कार्यशाळेसाठी 100 पदव्युत्तर विद्याथी तसेच 10 संशोधक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवीला.