वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), पदवीपूर्व कृषी अभियांत्रीकी विद्यार्थ्यांसाठी वीस आठवडीय “पदवीपूर्व कृषी अभियांत्रीकी विद्यार्थ्यांसाठी चार महिने इंटर्नशीप प्रशिक्षण कार्यक्रम” या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 21 जानेवारी ते 21 मे, 2022 दरम्यान आयोजित केले आहे.
या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ दि. 25 जानेवारी, 2022 रोजी संपन्न झाला, या कार्यक्रमाचे प्रसंगी डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वनामकृवी, परभणी यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोपाळ शिंदे, प्रमुख अन्वेषक, नाहेप प्रकल्प, वनामकृवी, परभणी हे होते. तसेच विषेश निमंत्रीत म्हणून डॉ. पी. ए. मुंडे, डॉ. बी. एस.आगरकर, डॉ. कैलास डाखोरे, इंजी. डि. व्हि. पाटील यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाची प्रस्तावना इंजी. डि. व्हि. पाटील यांनी केली. तसेच प्रशिक्ष्ाण कार्यक्रमाचा उद्देश व आराखडा थोडक्यात विशद केला. या प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थाना नाहेप प्रकल्पातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. उदय खोडके, यांनी नाहेप प्रकल्पा विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, नाहेप प्रकल्पात असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे की, कॉम्पुटर एडेड डिझाइन सॉफटवेअर, जीआयएस, ड्रोन, रोबोट, स्वयंचलीत यंत्रे, थ्रीडि प्रिंटर यांचा सखोल अभ्यास करावा असे आवाहन केले.अध्यक्षीय समारोपात डॉ. गोपाळ शिंदे यांनी सर्वांना नाहेप प्रकल्प व त्यातील उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रशिक्षण कार्यम्रमाचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी प्रकल्प अहवाल तयार करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अशोक ढवण, मा. कुलगुरु, आणि डॉ. डी.एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि), वनामकृवि, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. बी. एस.आगरकर आणि इंजी. डि. व्हि. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अनिकेत वाईकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजी. रवीकुमार कल्लोजी, इंजी खेमचंद कापगते, डॉ. अविनाश काकडे, डॉ. हेमंत रोकडे, इंजी. शिवानंद शिवपुजे, डॉ. शिवराज शिंदे, इंजी. विश्वप्रताप जाधव, इंजी. गोपाळ रणेर, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, मारोती रणेर, गंगाधर जाधव आणि जगदीश माने यांनी सहकार्य केले.
Leave A Comment