वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतीक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व आयआयटी, पवई यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यापीठ शास्त्रज्ञांकरिता रिमोट सेन्सींग व जिआयएस तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर विषयावर एक आठवडयाचे प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक २० ते २५ जानेवारी दरम्यान करण्यात आले असुन दिनांक २० जानेवारी रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय खोडके हे होते तर आयआयटी पवई चे प्राध्यापक डॉ. पेन्नन चिन्नासामी हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी विद्यापीठातील विविध विभागांची व नाहेप अंतर्गत विभागाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जीआयएस व रिमोट सेन्सिंग प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संशोधन करण्याचा सल्ला दिला तर डॉ. पेन्नन चिन्नासामी यांनी रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा कृषि संशोधनातील महत्व सांगुन प्रशिक्षणार्थीनी संशोधन प्रकल्प तयार करण्यास सागितले.
याप्रसंगी नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाच्या विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात आयोजन सचिव प्रा. संजय पवार यांनी प्रशिक्षणाचा उद्देश व प्रशिक्षण यावर माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. मेघा जगताप यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण वैद्य यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन सचिव डॉ. राजेश कदम, प्रा. संजय पवार व डॉ. प्रवीण वैद्य यांनी परिश्रम घेतले. नाहेपचे डॉ. अनिकेत वाईकर, रवीकुमार कल्लोजी, शिवानंद शिवपुजे, नरेंन्द्र खत्री आदींनी तांत्रिक सहाय्यक केले तर प्रक्षेत्र सहाय्यक गंगाधर जाधव, मारोती रनेर, जगदीश माने आदींनी सहकार्य केले.
सदरिल प्रशिक्षणात आयआयटी पवई चे नामांकित प्राध्यापक डॉ. पेन्नन चिन्नासामी व त्यांचा समुह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पेन्नन चिन्नासामी हे भूजल मॉडेलिंग, रिमोट सेन्सिंग आणि जी आय एस या विषयाचे प्रमुख संशोधक, शास्त्रज्ञ प्राध्यापक आहेत. प्रशिक्षणासाठी एकूण ५० पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यापीठ शास्त्रज्ञ यांनी नोंदणी केली आहे.
Leave A Comment