वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व जागतिक बॅक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प – नाहेप अंतर्गत “आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काटेकोर शेती” विषयावर १ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान एक महिन्याचे पदव्युत्तर व आचार्य विद्यार्थाकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक १ डिसेंबर रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे हे होते तर डॉ. भारत आगरकर, डॉ. राहुल भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गोपाळ शिंदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना नाहेपच्या विविध योजना व प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. तर मार्गदर्शनात डॉ. भारत आगरकर यांनी आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनात करणे गरजेचे असल्याचे म्हणाले. प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा काटेकोर शेती करिता वापराबाबत शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणासाठी विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य विद्यार्थांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनिकेत वाईकर यांनी केले तर आभार इंजि. खेमचंद कापगाते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन सचिव इंजि. खेमचंद कापगाते, इंजि. रविकुमार कल्लोजी तसेच डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. अविनाश काकडे, डॉ. शिवराज शिंदे, मुक्ता शिंदे, रेखा ढगे, गंगाधर जाधव, श्री. जगदीश माने यांनी काम पाहिले.
Leave A Comment