राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली व जागतीक बँक यांच्या सहकार्याने नाहेप, वनामकृवि यांच्या विद्यमाने तीन दिवसीय प्रशिक्षण दि. 18/04/2022 ते 20/04/2022 या दरम्यान पदव्युत्तर व आचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्यासाठी “शेतीसाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा उपयोग” या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणांचा उदघाटन समारंभ 18/04/2022 रोजी संपन्न झाला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन इंजी. वैभव देशपांडे, उपाध्यक्ष, एआयटी ग्लोबल, पुणे तसेच प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. कैलास डाखोरे, इंजी. गौरव कुलकर्णी, इंजी. सोपान झेंडे आणि इंजी. निरज शेकटकर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी अध्यक्ष म्हणुन डॉ, गोपाळ शिंदे, प्रमुख अन्वेषक, नाहेप, वनामकृवी हे होते.
डॉ. कैलास डाखोरे, आयोजन सचिव यांनी प्रशिक्षणाचा उद्देश विषद केला तसेच प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी संशोधन कार्यात करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंजी. वैभव देशपांडे यांनी कृषि उद्योगात स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर केल्यास विविध बदल होतील असे सांगितले. ते म्हणाले की कृषि क्षेत्रात स्वयंचलित उपकरणे, सॉफ्टवेअर, आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करणे आवश्यक बनले आहे. डॉ, गोपाळ शिंदे, यांनी अध्यक्षीय समारोपात नाहेप प्रकल्पाविषयी उपस्थितांना माहिती दिली व प्रशिक्षणामुळे आधुनिक कृषि क्षेत्रात होणा-या विविध बदलाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अशा प्रकारचे प्रशिक्षण पुढील कार्यकाळात देखील आयोजीत करण्यात येणार आहे, विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रशिक्षणामध्ये 60 पदव्युत्तर विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी नोंदणी केली आहे.
या तीन दिवसीय प्रशिक्षणात इंजी. गौरव कुलकर्णी, इंजी. सोपान झेंडे आणि इंजी. निरज शेकटकर, डॉ. अजय देशमुख, इंजी. विनयकुमार आणि श्रीमती. काजल राजवैद्य या उद्योग जगतातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या प्रशिक्षणासाठी मा. डॉ. अशोक ढवण, कुलगुरु, वनामकृवी, परभणी तसेच डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण व अधिष्ठाता (कृषी), वनामकृवी, परभणी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंजी. धम्मज्योती पिंपळेकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अनिकेत वाईकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन सचिव डॉ. कैलास डाखोरे, इंजी. रवीकुमार कल्लोजी व डॉ. अनिकेत वाईकर, इंजी. शिवानंद शिवपुजे, डॉ. शिवराज शिंदे यांनी परिश्रम घेतले. तांत्रिक सहाय्यक म्हणुन नाहेपचे इंजी. अपुर्वा देशमुख, इंजी. संजीवनी कानवटे, डॉ. श्वेता सोळंके, इंजी. तनझीम खान, फारुखी अब्दुल बारी, इंजी. गोपाळ रनेर, इंजी. विश्वप्रताप जाधव, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, मारोती रनेर, जगदीश माने व प्रदीप मोकाशे यांनी काम पाहिले.
Leave A Comment