वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प आणि नागपुर येथील राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ऑगस्ट रोजी बौध्दीक संपदा अधिकार आणि पेटेंट यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आभासी माध्यमातुन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणी हे होते तर कार्यशाळेत प्रमुख वक्ते राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्थचे सहाय्यक नियंत्रक डॉ. भारत सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नाहेप प्रकल्प मुख्य अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे, कार्यक्रम समन्वयक डॉ गोदावरी पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. भारत सुर्यवंशी यांनी बौध्दीक संपदा अधिकार क्षेत्रात कृषिच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी बौध्दीक संपदा अधिकार आणि पेटेंट विषयी अनेक अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांनी याचे ज्ञान अवगत करावे. कोणत्याही उत्पादन विकास कंपनी, रुग्णालये, संशोधन लॅब, स्टार्ट-अपमध्ये आपण काम करू शकता किंवा तुमची स्वतःची बौध्दीक संपदा कंपनी सुरू करू शकता. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये बौध्दीक संपदा एजंट म्हणून नोकरी करून शकता. कृषि क्षेत्रातील अनेक संशोधनात्मक बाबींचे बौध्दीक संपदा अधिकार प्राप्त करू शकतो. यावेळी त्यांनी बौध्दीक संपदा व अधिकार यांचा कृषी क्षेत्रातील वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, कृषी क्षेत्रात वेगवेगळया विषयांवर संशोधन केले जाते. त्या संशोधनाला पेंटेट मध्ये रुपांतरीत करणे आवश्यक आहे. त्याचा फायदा शिक्षण, संशोधन व समाजातील सर्वस्तरातील घटकांना घेता येवु शकतो. यांचा फायदा विद्यापीठाचे मानांकन उंचविण्यासाठी होतो.
कार्यशाळेचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्रकल्प मुख्य अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाबद्दल माहिती दिली तर कार्यक्रम समन्वयक डॉ. गोदावरी पवार यांनी कार्यक्रमाची पार्श्वभुमी सांगितली. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. मेघा जगताप यांनी करुन दिला. सुत्रसंचालन इंजी. अपुर्वा वाईकर यांनी केले तर आभार डॉ. हेमंत रोकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजी. रवीकुमार कल्लोजी, इंजी. श्रध्दा मुळे, डॉ. अनिकेत वाईकर, फारुखी अब्दुल बारी, डॉ. शिवराज शिंदे, इंजी. संजीवनी कानवटे, डॉ. श्वेता सोळंके, इंजी. शिवानंद शिवपुजे, इंजी पौर्णिमा राठोड, श्री. रामदास शिंपले, श्री. गंगाधर जाधव, श्री. मारोती रनेर, श्री. जगदीश माने आदीं सहकार्य केले. कार्यशाळेत कृषि संशोधक, प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी आदी सुमारे ३५० हून अधिक प्रशिक्षणार्थीनी नोंदणी केली.
Leave A Comment