राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) येथे ग्राफटींग रोबोटच्या साहाय्याने पालेभाज्या व काही फळवर्गीय वाणांचे कलमीकरणचे प्रात्याक्षिक दिनांक 13 व 14 मार्च, 2023 साऊथ कोरीयाच्या एच. आर. सी. कंपनीद्वारे श्री जेरेमी एच जे पार्क यांच्या मागदर्शनाखाली नाहेप, वनामकृवी परभणी येथे सकाळी 10:00 ते सांयकाळी 05:00 पर्यंत आयोजीत करण्यात आलेला आहे. या प्रात्याक्षिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. इंद्र मनी, वनामकृवी, परभणी व मार्गदर्शक संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले हे असतील आणि नाहेप प्रकल्पाविषयी डॉ. गोपाळ शिंदे, प्रमुख अन्वेषक, नाहेप प्रकल्प, वनामकृवी, परभणी हे माहिती देतील तसेच प्रात्याक्षिक व तंत्रप्रशिक्षणासं प्रा. ङि व्हि. पाटिल, प्रा. आर. व्ही. शिंदे मार्गदर्शन करतील.
या प्रात्याक्षिक प्रशिक्षणांस नर्सरी उद्योजकांनी आपली रोपे विशीष्ट आकार व वयाची घेऊन यावीत व कलमे करुन घेऊन जावीत. सदर प्रशिक्षणास 13 मार्चला संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी व 14 मार्चला नर्सरी चालक, शेतकरी, उद्योजक सहभाग नोंदवतील (सदर नोंदणी करीता खालील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी व खालील क्रंमाकावर सपंर्क साधावा)
संकेतस्थळ – https://nahep.vnmkv.org.in
संपर्क – अंजीक्य ब्रम्हनादकर – 9599000287 / अमीर खान – 9730385160
Leave A Comment