राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) येथे ग्राफटींग रोबोटच्या साहाय्याने पालेभाज्या व काही फळवर्गीय वाणांचे कलमीकरणाची प्रशिक्षण व कार्यशाळा दिनांक 13 व 14 मार्च, 2023 साऊथ कोरीयाच्या एच. आर. सी. कंपनीद्वारे श्री जेरेमी एच जे पार्क यांच्या मागदर्शनाखाली नाहेप, वनामकृवी परभणी येथे सकाळी 10:00 ते सांयकाळी 05:00 पर्यंत आयोजीत करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले हे उपस्थित होते. त्यांनी नर्सरी उद्योजक व शेतकरी यांनी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान केले. तसेच नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी शेतकरी, नर्सरी उद्योजक यांना माहिती दिली. हेल्पर रोबोटेक कंपनी, साऊथ कोरीया येथील संशोधक श्री जेरेमी एच जे पार्क यांनी कलमीकरण रोबोट विषयी सवीस्तर मार्गदर्शन करुन टोमॅटो व वांगी रोपांच्या रोबोटद्वारे कलमीकरण प्रात्याक्षीक करुन दाखवीले.
या प्रात्याक्षिक कार्यशाळेसाठी 25 नर्सरी उद्योजक व शेतकरी यांनी सहभाग नोंदवीला.
Leave A Comment