भारतीय पोलिस सेवेतील मुंबईचे पोलिस सह आयुक्त वाहुतक मा श्री मधुकर पांडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प – नाहेप यासह दिनांक १० मार्च रोजी सदिच्छा भेट दिली. विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी त्यांचे विद्यापीठाच्या वतीने स्वागत केले. भेटी प्रसंगी प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे यांनी प्रकल्पातील आंतरराष्ट्रीय दर्जेचे चालु असलेल्या डिजिटल शेती संशोधन व तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. प्रकल्पातील कृषि यंत्रमानव, ड्रोन, स्वयंचलित यंत्र आदिंच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीतील वापराबाबत त्यांनी विचारपुस केली. प्रकल्पात चालु असलेल्या संशोधनात्मक कामाबाबत त्यांनी प्रशंसा केली.
यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे, कृषि हवामान शास्त्रज्ञ डॉ कैलास डाखोरे, इंजि. खेमचंद कापगाते, इंजि. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, इंजि. अपुर्वा देशमुख, इंजि. धम्मज्योती पिपंळेकर, डॉ. श्वेता सोळंके, इंजि. संजीवनी कानवटे, मुक्ता शिंदे, जगदीश माने, गंगाधर जाधव, मारोती रणेर आदींनी प्रकल्पातील विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.
Leave A Comment