राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) येथे ग्राफटींग रोबोटच्या साहाय्याने पालेभाज्या व काही फळवर्गीय वाणांचे कलमीकरणाची प्रशिक्षण व कार्यशाळा दिनांक 20 व 24 मार्च, 2023 जपान येथील डॉ. ई. एस. शिवशंकर, संचालक, श्री. मुरा कोशी आणि श्री. जुगो मिनोहरा केकेके, जपान यांच्या मागदर्शनाखाली नाहेप, वनामकृवी परभणी येथे सकाळी 10:00 ते सांयकाळी 05:00 पर्यंत आयोजीत करण्यात आलेला आहे. या कार्यशाळेचा उद्यघाटन सोहळा दिनांक 20 मार्च, 2023 रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. इंद्र मनी, वनामकृवी, परभणी यांची उपस्थिती होती व प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. यु. एम. खोडके, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, वनामकृवी परभणी हे उपस्थित होते तसेच नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी विद्यार्थी यांना माहिती दिली. केकेके जपान येथील संशोधक डॉ. ई. एस. शिवशंकर यांनी रोबोट विषयी उपस्थित 50 विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच श्री. मुरा कोशी आणि श्री. जुगो मिनोहरा यांनी कलमीकरण रोबोट विषयी मार्गदर्शन केले.
इंजि. डि. व्हि. पाटिल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. तसेच डॉ. गोदावरी पवार, डॉ. के. के. डाखोरे, डॉ. डि. डि. टेकाळे यांनी कार्यक्रमास उपस्थिती होती. तसेच प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवी विद्यार्थी व वनामकृवी संशोधक यांनी दिनांक 23 मार्च, 2023 तसेच दिनांक 24 मार्च, 2023 रोजी नर्सरी उद्योजक व शेतकरी यांना या कार्यशाळेस उपस्थित राहून कृषि क्षेत्रातील भाजीपाल्याचे कलमीकरण करण्यासाठी प्रगत रोबोट तंत्रज्ञानाचा वापर कार्यशाळेस सहभागी होण्याकरीता आव्हान केले.
Leave A Comment