NAHEP Blog
कृषि क्षेत्रातील भाजीपाल्याचे कलमीकरण करण्यासाठी प्रगत रोबोट तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज – डॉ. इंद्र मनी
By sanjivani|2023-03-20T10:28:03+00:00March 20, 2023|Categories: Latest News|Tags: परभणी राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, साऊथ कोरीया यांच्या संयुक्त विद्यमाने, हेल्पर रोबोटेक कंपनी|0 Comments
राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) येथे ग्राफटींग रोबोटच्या साहाय्याने पालेभाज्या व काही फळवर्गीय वाणांचे कलमीकरणाची प्रशिक्षण व कार्यशाळा दिनांक 20 व 24 मार्च, 2023 जपान येथील डॉ. ई. एस. शिवशंकर, संचालक, श्री. मुरा कोशी आणि श्री. जुगो मिनोहरा केकेके, जपान यांच्या मागदर्शनाखाली नाहेप, वनामकृवी परभणी येथे सकाळी 10:00 ते सांयकाळी 05:00 पर्यंत आयोजीत करण्यात आलेला आहे. या कार्यशाळेचा उद्यघाटन सोहळा दिनांक 20 मार्च, 2023 रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. इंद्र मनी, वनामकृवी, परभणी यांची उपस्थिती होती व प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. यु. एम. खोडके, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, वनामकृवी परभणी हे उपस्थित होते तसेच नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी विद्यार्थी यांना माहिती दिली. केकेके जपान येथील संशोधक डॉ. ई. एस. शिवशंकर यांनी रोबोट विषयी उपस्थित 50 विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच श्री. मुरा कोशी आणि श्री. जुगो मिनोहरा यांनी कलमीकरण रोबोट विषयी मार्गदर्शन केले.
इंजि. डि. व्हि. पाटिल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. तसेच डॉ. गोदावरी पवार, डॉ. के. के. डाखोरे, डॉ. डि. डि. टेकाळे यांनी कार्यक्रमास उपस्थिती होती. तसेच प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवी विद्यार्थी व वनामकृवी संशोधक यांनी दिनांक 23 मार्च, 2023 तसेच दिनांक 24 मार्च, 2023 रोजी नर्सरी उद्योजक व शेतकरी यांना या कार्यशाळेस उपस्थित राहून कृषि क्षेत्रातील भाजीपाल्याचे कलमीकरण करण्यासाठी प्रगत रोबोट तंत्रज्ञानाचा वापर कार्यशाळेस सहभागी होण्याकरीता आव्हान केले.
जलद गतीने पालेभाज्या व फळवर्गीय वाणांचे कलमीकरण करण्यासाठी रोबोटचा वापर काळाची गरज – डॉ. प्रा डॉ. धर्मराज गोखले
By sanjivani|2023-03-14T10:13:07+00:00March 14, 2023|Categories: Latest News|Tags: परभणी राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, साऊथ कोरीया व जपानची केंकेके कंपनी|0 Comments
राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) येथे ग्राफटींग रोबोटच्या साहाय्याने पालेभाज्या व काही फळवर्गीय वाणांचे कलमीकरणाची प्रशिक्षण व कार्यशाळा दिनांक 13 व 14 मार्च, 2023 साऊथ कोरीयाच्या एच. आर. सी. कंपनीद्वारे श्री जेरेमी एच जे पार्क यांच्या मागदर्शनाखाली नाहेप, वनामकृवी परभणी येथे सकाळी 10:00 ते सांयकाळी 05:00 पर्यंत आयोजीत करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले हे उपस्थित होते. त्यांनी नर्सरी उद्योजक व शेतकरी यांनी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान केले. तसेच नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी शेतकरी, नर्सरी उद्योजक यांना माहिती दिली. हेल्पर रोबोटेक कंपनी, साऊथ कोरीया येथील संशोधक श्री जेरेमी एच जे पार्क यांनी कलमीकरण रोबोट विषयी सवीस्तर मार्गदर्शन करुन टोमॅटो व वांगी रोपांच्या रोबोटद्वारे कलमीकरण प्रात्याक्षीक करुन दाखवीले.
या प्रात्याक्षिक कार्यशाळेसाठी 25 नर्सरी उद्योजक व शेतकरी यांनी सहभाग नोंदवीला.
जलद गतीने पालेभाज्या व फळवर्गीय वाणांचे कलमीकरण करण्यासाठी रोबोटचा वापर काळाची गरज – डॉ. प्रा डॉ. धर्मराज गोखले
By sanjivani|2023-03-13T10:23:44+00:00March 13, 2023|Categories: Latest News|Tags: परभणी राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, साऊथ कोरीया यांच्या संयुक्त विद्यमाने, हेल्पर रोबोटेक कंपनी|0 Comments
राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) येथे ग्राफटींग रोबोटच्या साहाय्याने पालेभाज्या व काही फळवर्गीय वाणांचे कलमीकरणाची प्रशिक्षण व कार्यशाळा दिनांक 13 व 14 मार्च, 2023 साऊथ कोरीयाच्या एच. आर. सी. कंपनीद्वारे श्री जेरेमी एच जे पार्क यांच्या मागदर्शनाखाली नाहेप, वनामकृवी परभणी येथे सकाळी 10:00 ते सांयकाळी 05:00 पर्यंत आयोजीत करण्यात आलेला आहे. या कार्यशाळेचा उद्यघाटन सोहळा दिनांक 13 मार्च, 2023 रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. इंद्र मनी, वनामकृवी, परभणी यांची ऑनलाईन उपस्थिती होती व प्रमुख पाहूणे म्हणून संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले हे उपस्थित होते तसेच नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी संशोधक, प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी यांना माहिती दिली. हेल्पर रोबोटेक कंपनी, साऊथ कोरीया येथील संशोधक श्री जेरेमी एच जे पार्क यांनी कलमीकरण रोबोट विषयी सवीस्तर मार्गदर्शन केले.
या प्रात्याक्षिक कार्यशाळेसाठी 100 पदव्युत्तर विद्याथी तसेच 10 संशोधक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवीला.
वनामकृवित शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली वर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
By sanjivani|2023-03-13T09:34:17+00:00March 13, 2023|Categories: Latest News|0 Comments
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि भारतीय कृषि सांख्यिकी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नाहेप प्रकल्पांतर्गत शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली यावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि अध्यक्षतेखाली संपन्न झाले, यावेळी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रशांतकुमार पाटील, भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. सुदीप मारवाह, आयटी सल्लागार डॉ. आर.सी. गोयल, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. इंद्रा मणी म्हणाले की, ऑनलाईन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली मुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार असुन विविध शैक्षणिक प्रक्रिया स्वयंचलित होणार आहेत. यामुळे विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार असुन वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम राबविण्यास मोठा हातभार लाभणार आहे. यावेळी कुलगुरू मा डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
डॉ सुदिप मारवाह म्हणाले की, शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीमुळे सर्व शैक्षणिक कार्य वेळेत पुर्ण होऊन विद्यार्थ्यीचे विविध अभ्यासक्रमातील प्रवेशापासुन ते पदवी अभ्यासक्रम पुर्ण होई पर्यंत सर्व माहिती प्रणालीत अद्यायावत होणार आहे, यात अभ्यासक्रम व्यवस्थापन, विद्यार्थी व्यवस्थापन, विद्याशाखा व्यवस्थापन, ई लर्निंग आणि ऑनलान शुल्क संकलन याचा समावेश असुन यामुळे विद्यापीठाची कार्यक्षमता वाढीस लागणार आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे.
मार्गदर्शनात डॉ. आर. सी. गोयल म्हणाले की, ऑनलाईन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली माध्यमातून संस्थेची प्रत्येक शैक्षणिक माहिती विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासक यांना एका क्लिकवर कुठेही आणि केव्हाही उपलब्ध होणार आहे डॉ. धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाने शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली करिता विद्यापीठ करित असलेलया कार्याची माहिती दिली.
दोन दिवसातील तांत्रिक सत्रात डॉ. आर. सी. गोयल, श्रीमती रजनी गुलिया आणि श्रीमती निशा यांनी शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (एएमएस), ऑनलाईन शिक्षण प्रणाली, ई-लर्निंग आदीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रणजित चव्हाण यांनी केले तर मुख्य अन्वेषक डॉ. गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्पातील उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ. रविंद्र शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठ अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. जे. ई. जहागीरदार, डॉ. एस. डी. बांतेवाड, डॉ. आर. डी. अहिरे, डॉ. बी. व्ही. आसेवार, डॉ. के. आर. कांबळे, डॉ. आर. बी. क्षीरसागर आदीसह प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. विद्यापीठाच्या शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
प्रात्यक्षिक – रोबोटच्या साहाय्याने तयार केले जातील फळबागेसाठी कलम
By sanjivani|2023-03-13T09:02:55+00:00March 13, 2023|Categories: Latest News|Tags: परभणी राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, साऊथ कोरीया व जपानची केंकेके कंपनी|0 Comments
राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) येथे ग्राफटींग रोबोटच्या साहाय्याने पालेभाज्या व काही फळवर्गीय वाणांचे कलमीकरणचे प्रात्याक्षिक दिनांक 13 व 14 मार्च, 2023 साऊथ कोरीयाच्या एच. आर. सी. कंपनीद्वारे श्री जेरेमी एच जे पार्क यांच्या मागदर्शनाखाली नाहेप, वनामकृवी परभणी येथे सकाळी 10:00 ते सांयकाळी 05:00 पर्यंत आयोजीत करण्यात आलेला आहे. या प्रात्याक्षिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. इंद्र मनी, वनामकृवी, परभणी व मार्गदर्शक संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले हे असतील आणि नाहेप प्रकल्पाविषयी डॉ. गोपाळ शिंदे, प्रमुख अन्वेषक, नाहेप प्रकल्प, वनामकृवी, परभणी हे माहिती देतील तसेच प्रात्याक्षिक व तंत्रप्रशिक्षणासं प्रा. ङि व्हि. पाटिल, प्रा. आर. व्ही. शिंदे मार्गदर्शन करतील.
या प्रात्याक्षिक प्रशिक्षणांस नर्सरी उद्योजकांनी आपली रोपे विशीष्ट आकार व वयाची घेऊन यावीत व कलमे करुन घेऊन जावीत. सदर प्रशिक्षणास 13 मार्चला संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी व 14 मार्चला नर्सरी चालक, शेतकरी, उद्योजक सहभाग नोंदवतील (सदर नोंदणी करीता खालील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी व खालील क्रंमाकावर सपंर्क साधावा)
संकेतस्थळ – https://nahep.vnmkv.org.in
संपर्क – अंजीक्य ब्रम्हनादकर – 9599000287 / अमीर खान – 9730385160
Categories
Recent Posts
- कृषि क्षेत्रातील भाजीपाल्याचे कलमीकरण करण्यासाठी प्रगत रोबोट तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज – डॉ. इंद्र मनी
- जलद गतीने पालेभाज्या व फळवर्गीय वाणांचे कलमीकरण करण्यासाठी रोबोटचा वापर काळाची गरज – डॉ. प्रा डॉ. धर्मराज गोखले
- जलद गतीने पालेभाज्या व फळवर्गीय वाणांचे कलमीकरण करण्यासाठी रोबोटचा वापर काळाची गरज – डॉ. प्रा डॉ. धर्मराज गोखले
- वनामकृवित शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली वर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
- प्रात्यक्षिक – रोबोटच्या साहाय्याने तयार केले जातील फळबागेसाठी कलम