वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्नप्रक्रिया उद्योजक संघटना आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली “डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आले आहे. वेबिनाराचे उदघाटन राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री मा ना श्री सुभाष देसाई यांच्या विशेष उपस्थितीत पार पडणार असुन अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणुन पुणे येथील कृषि विपणन (महाराष्ट्र राज्य) चे संचालक मा श्री सतीश सोनी व नाशिक येथील सह्याद्री फार्मचे संचालक मा श्री विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत तर नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ आर सी अग्रवाल, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ प्रभात कुमार, प्राचार्य डॉ अरविंद सावते आदींची उपस्थिती राहणार आहे.
समारोपीय समारंभ अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त मा डॉ अरूण उन्हाळे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडणार असुन विशेष अतिथी म्हणुन नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्न प्रक्रिया उद्योजक संघटनाचे अध्यक्ष मा डॉ सुबोध जिंदाल व भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातील जैव तंत्रज्ञान विभागाच्या संचालिका डॉ संगिता कस्तुरे उपस्थित राहणार आहेत.
पाच दिवस चालणा-या वेबीनर मध्ये देशातील कृषि प्रक्रिया क्षेत्रातील अग्रगण्य अशा उद्योगांचे प्रमुख तथा संचालक मार्गदर्शन करणार आहेत, या उद्योजकांच्या यशोगाथा प्रत्यक्षपणे त्यांच्या तोंडुन ऐकता येणार असुन त्यात विविध कृषि प्रक्रिया उद्योगांबाबत सखोल चर्चा करणार आहेत. उद्योग उभारतांना उद्योजकांना येणा-या अडचणी, त्यावरील उपाय, शेतमाल ऑनलाईन पध्दतीने विविध कंपन्यांमार्फत ग्राहकांना विकणे, निर्यात करणे, केंद्र व राज्य शासनाच्या कृषि प्रक्रिया उद्योगाकरीता असणा-या विविध योजना तसेच गटशेती व कृषि उद्योग या बाबत माहिती मिळणार आहे. तसेच या उद्योगपतीशी प्रत्यक्ष चर्चाही करता येणार आहे. या ऑनलाईन वेबिनारचा मुख्य उद्देश प्रगतशील शेतकरी, बचतगटाचे सदस्य, शेतकरी गट, नवउद्योजक, लघुउद्योजक व गृह उद्योजक, विद्यार्थी यांना अन्न प्रक्रिया व शेतीपुरक उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे, उद्योग संधीच्या दिशा दाखविणे, मनातील उद्यमशीलतेस जागृत करणे हा आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर अशा प्रकारचे राज्यात ऑनलाईन वेबिनार प्रथमच होत असुन कृषि प्रक्रिया उद्योगातील नविन संधीचा शोध नवउद्योजकांना घेता येईल. वेबिणारचे मुख्य आयोजक अखिल भारतीय अन्न प्रक्रिया उद्योजक संघटनाच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ प्रबोध हळदे, मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन चे संचालक श्री उमेश कांबळे, नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्वषेक डॉ गोपाल शिंदे आहेत. सदरिल वेबिणारचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार असुन प्रत्यक्ष झुम मिंटिग मध्ये सहभागी होण्यासाठी आयोजक सचिव डॉ. राजेश क्षीरसागर (मो.9834905580), डॉ. भारत आगरकर (मो. 8196036114), डॉ. शाम गरुड (मो.9481734569) यांच्याशी संपर्क साधावा.
सदरिल वेबिणार मध्ये पुढील विषयावर कृषि प्रक्रिया क्षेत्रातील देशातील नामांकित कंपनीचे संचालक तथा मुख्य व्यवस्थापक थेट संवाद साधणार आहेत.
दिनांक २७ जुलै रोजी सहकारी शेती व उद्योग यावर नाशिक येथील सह्याद्री फार्मचे संचालक मा श्री विलास शिंदे, मशरुम उत्पादन व प्रक्रिया उद्योगातील नविन संधी यावर गोवा येथील झुआरी फुड्स अॅन्ड फार्म्स् प्रा.लि. चे अध्यक्ष मा डॉ संगम कुहाडे, तर ग्रामीण भागातील फळ प्रक्रिया उद्योग भरारी यावर उदगीर येथील पदमीनी फुड प्रॉडक्ट्स संचालक मा. श्री कालीदास जाधव मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक २८ जुलै रोजी कोविड १९ पार्श्वभुमीवर अन्न प्रक्रिया उद्योगातील नविन संधी यावर जळगाव येथील जैन ईरीगेशन्स अॅग्रो अॅन्ड फुड प्रोसेसिंग डिव्हिजनचे अध्यक्ष डॉ. दिलीप कुलकर्णी, दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगावर कळंब येथील मराठवाडा अॅग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. चे संचालक मा. बालाजी गिते, तर कृषि प्रक्रिया उद्योगातील विविध शासकीय योजना यावर मुंबई येथील आय.टी.सी.ओ.टी. कन्सलटन्स अॅन्ड सर्विसेस लि. चे उपाध्यक्ष श्री अमोल चिद्रवार मार्गदर्शन करणार आहेत
दिनांक २९ जुलै रोजी शेतीमाल पुर्व प्रक्रिया तंत्रज्ञान व निर्यात यावर नामधारी सिड्स प्रा.लि. बेंगलोर चे महाव्यवस्थापक व संचालक मा. श्री सुनिल अवारी, गट शेती कृषि प्रक्रिया उद्योग (पेरु, पपई, हळद) यावर परभणी येथील विश्वास अॅग्रो फुड प्रॉडक्ट्सचे संचालक मा. श्री युसुफ ईनामदार, शेतीमाल पुर्व प्रक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापनावर बेंगलोर येथील क्लाऊंड टेल इंडिया प्रा.लि.चे प्रमुख मा.श्री सचिन अचिंतलवार, तर फळे व भाजीपाल पुर्व पक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापनावर बेंगलोर येथीलफुड सेफ्टी अॅमेझॉनचे वरिष्ठ व्यवस्थापक मा. श्री शशिन शोभने मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक ३० जुलै रोजी ग्रामीणस्तरावर अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महिला सक्षमीकरण यावर हिमाचल प्रदेश मधील भुईरा जॅम्सच्या संचालिका श्रीमती रिबेका मुशरन, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महिलांसाठी संधी व आव्हाने यावर ठाणे येथील ङि टेक्नॉलॉजी प्रा.लि. च्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. दिपा भाजेकर, तसचे विविध हर्बल एक्सट्रैक्ट्स आणि न्युट्रासिटिकल्स निर्मिती यावर वसमत येथील भुमी न्युट्रॉसिटिकल्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री आतिश साळुंके मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक ३१ जुलै रोजी सेंद्रिय शेतिमाल प्रक्रिया व प्रमाणिकरण यावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुरेश थोरात तर निसर्ग वनशेतीव्दारे शेतकरी बांधवाचा आर्थिक विकास यावर कर्नाटक व गोवा राज्याचे इंन्कम टॅक्स विभागाचे मुख्य आयुक्त डॉ पंतजली झा मार्गदर्शन करणार आहेत.
Leave A Comment